Vastushanti Puja – वास्तुशांती म्हणजे काय?

वास्तु शांत व्हावी म्हणून केलेली पूजा म्हणजे वास्तुशांत.वसन वास म्हणजे राहणे त्यातून पुढे वास्तू हा शब्द आला.

🌿वास्तु शांती का करावी🌿आपली वास्तु ज्या जागेवर उभी आहे त्या जागेवर जे लोक राहत होते त्यांना बिल्डिंग बांधायच्या वेळी मनात नसताना दुसरीकडे जावं लागलं असेल किंवा अपेक्षित मोबदला मिळाला नसेल तसेच बिल्डींग बांधायच्या वेळी जमीन खणणे, वृक्षतोड, कृमी, कीटक, मुंग्या, जीवजंतू यांची हत्या इत्यादीमुळे निर्माण झालेले दोष आहेत. त्यांचा परिहार होऊन वास्तू आपल्याला लाभावी घरामध्ये निरंतर सुखशांती लाभावी कुटुंबातील सर्व लोक आनंदी रहावे व वास्तु देवतेचा आशीर्वाद कुटुंबावर अखंड असावा म्हणून वास्तुशांती अवश्य करावी. दुसरी गोष्ट आपण जरी फ्लॅट बंगला घेतला असला तरी आपण म्हणताना घरच म्हणतो तर ते घराला घरपण वास्तुपण याव म्हणून वास्तुशांत असा हा त्याच्या मागचा विचार. आता आपण वास्तुशांत विधी कशाप्रकारे असतो आणि त्यात काय काय गोष्टी क्रमाक्रमाने  केल्या जातात  त्या पाहूयात प्रथम शरीरशुद्धी ने सुरुवात.

🌷 शरीरशुद्धी 🌷– सुरुवातीला गुरुजी यजमानांना शरीरशुद्धीसाठी पंचगव्य देतात. ( गायी पासून निर्माण झालेले पाच पदार्थ गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप, ) याला पंचगव्य असे म्हणतात व गुरुजी दर्भाचे पवित्रक अंगठी धारण करायला देतात 

🌹 कुंकुमतिलक धारण 🌹 यामधे यजमानांनी कपाळी कुंकुम तिलक धारण करावे 
🌸   देवता नमन  🌸
यामधे देवांना विडानारळ ठेवून देवाला मोठी माणसं गुरुजी यांना नमस्कार करून कार्याला सुरुवात करावी. =🍀संकल्प🍀= प्रथम पंचांगाचा उल्लेख करून संकल्प सांगितला जातो. पंचांग म्हणजे तिथी ,वार ,नक्षत्र करण,योग, आणि संकल्प म्हणजे ज्या कारणासाठी मी वास्तु शांत करतोय त्याला संकल्प असे म्हणतात.
🌷पुण्याहवाचन🌷 
सुरुवातीला यजमानांनी गणपतिपूजन पुण्याहवाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध इत्यादी पूजन करावे पुण्याहवाचन म्हणजे पुण्यकारक मंगलकारक मंत्रांचे गुरुजींनी केलेले वाचन म्हणजे पुण्याहवाचन.
🍀आचार्य ऋत्विक वरण🍀 
यामधे यजमानांनी गुरुजींना मुख्य देवतेच्या स्थापना पूजेसाठी वर्णी (आमंत्रण) द्यावी वर्णी म्हणजे गुरुजींना जे ज्ञात माहिती आहे त्याप्रमाणे मंत्रोच्चार  करून स्थापना पूजा करा म्हणून आमंत्रण देणे म्हणजे वर्णीे देणे होय.
 
🌷मुख्य देवता स्थापना पूजा🌷
  गुरुजी वास्तु देवतांची व वास्तु कलशाची स्थापना करतात. व मुख्य देवता वास्तु देवतेच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करतात नंतर स्थापना केलेल्या देवतांचे षोडशोपचार (आवाहन, आसन, पाद्य ,अर्घ्य,आचमन ,स्नान,वस्त्र  यज्ञोपवीत,गंध,फुलं,धूप,दीप नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्र पुष्पांजली,) पूजन करतात त्यानंतर यज्ञामध्ये अग्नीची स्थापना होते त्यानंतर गुरुजी नवग्रहांची स्थापना पूजा करतात.
🌺वास्तु यज्ञ होम हवन🌺
 यामधे वास्तु व नवग्रह देवतांचे हवन (होम) केले जाते होम हवन करण्यासाठी शक्यतो मातीच्या विटांचे यज्ञकुंड आवश्यक आहे कारण विटांचा संबंध हा मातीशी असतो म्हणून शक्यतो विटांचे यज्ञकुंड करावे हवनाच्या वेळी नवग्रहांसाठी समिधा  तूप तांदूळ किंवा भात  यांचे हवन केले जाते  व वास्तु देवतेसाठी समिधा  तीळ तूप  व पायस यांचे हवन केले जाते  यजमानांकडून बेल फळाच्या पाच आहुत्या दिल्या जातात 
🌷बलिदान🌷 
होम हवन झाल्यावर बलिदान केले जाते बलिदान म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये ज्या क्षुद्र देवता असतात त्यांच्यासाठी दिला जाणारा नैवेद्य म्हणजे बलिदान होय. 
🌸पूर्णाहुति🌸
 पूर्णाहुति म्हणजे आपण जे काही होम हवन केले आहे त्याची सांगता म्हणून यजमानांकडून पूर्णाहुति दिली जाते. 
🌷वास्तुदेवतापूजन🌷
 यामधे यजमानांकडून स्थापन केलेल्या देवतांचे पंचोपचारे(गंध फुल धूप,दीप नैवेद्य)पूजन केले जाते.
 🍀अभिषेक🍀 
यामधे स्थापन केलेल्या कलशांमधील पाण्याने यजमानांवरती अभिमंत्रित पाण्याने अभिषेक केला जातो
🌷अग्निपूजन🌷 
यामधे यजमानांकडून अग्नीची पूजा केली जाते 
🌹वास्तु निक्षेप🌹
शेवटी आग्नेय दिशेला खड्डा खणून यजमानांनी वास्तु प्रतिमेचे पूजन करून प्रतिमा पालथी निक्षेप करावी. वास्तूच्या पाठीवर आपल्या घराचा भार आहे असा त्यामागचा विचार आहे वास्तु देवता उग्र असल्यामुळे त्याला थंड पदार्थ म्हणून दहीभाताचा नैवेद्य दाखवावा व वास्तू देवतेची प्रार्थना करावी
 🌸गोप्रदान पीठदान🌸 कर्माची सांगता म्हणून गुरुजींना यथाशक्ती द्रव्य द्वारा गोप्रदान करावे व पीठदान करावे व आवाहन केलेल्या देवतांचे विसर्जन करावे
🍀आशीर्वाद🍀 
कर्म सांगता म्हणून गुरुजीं यजमानांना आशीर्वाद पर मंत्र म्हणून मंत्राक्षता नारळ फळे ई. आशीर्वाद स्वरूप देतात व तीर्थ प्रसाद दिला जातो ईथे कर्माची सांगता होते कर्म ईश्वराला अर्पण करावे.
 🌺टीप*आपल्या वास्तूमध्ये कायम  शुभकारक कारक  मंगलकारक बोलावे  कारण वास्तू कायम तथास्तु म्हणत असतो अधिक माहितीसाठी गुरुजी जंक्शनला संपर्क करा… धन्यवाद👏
Copyright Act by Gurujijunction.com