Udaka Shanti – उदक शांती म्हणजे काय

udakashanti puja- gurujijunction

Udaka Shanti Pooja – A Pooja for progress, prosperity & for removing obstacles.

The Udaka Shanti Pooja is done for the auspicious results – starting from the well being, better relations and peace/shanti at home, success in an interview or business and so on.

This will involve the recital of total  i.e.  It takes more than 3 hours consisting the recitation of total 1441 lines – 131 Panjadi (1 Panjadi = 11 Vakya).

उदक शांती म्हणजे काय ? उदक म्हणजे पाणी अभिमंत्रित केलेल्या पाण्याने घराची शुद्धी करणे याला उदक शांती असे म्हणतात उदक शांती केव्हा करावी? घर घेतल्यावर आणि वास्तुशांतीचा मुहूर्त उशिरा असल्यास वा घरामध्ये रंगकाम फर्निचर चे काम चालू असल्यास गृहप्रवेश उदक शांती करून रहायला जायला हरकत नाही पण वास्तुशांती च्या मुहूर्तावर वास्तुशांत अवश्य करावी. तसेच नोकरी धंद्यामध्ये अपेक्षित यश मिळावे तसेच घरांमध्ये सकारात्मकता टिकून रहावी यासाठी सुद्धा उदक शांती करता येते.

उदकशांती विधी – सुरुवातीला शरीरशुद्धीसाठी पंचगव्य दिले जाते पंचगव्य म्हणजे गायीपासून निर्माण झालेले पाच पदार्थ जसे की गोमुत्र शेण दूध दही तूप याला पंचगव्य असे म्हणतात त्यानंतर यजमानांनी कपाळी कुंकुमतिलक धारण करून देवाला विडा नारळ ठेवून देवाला मोठी माणसं गुरुजी यांना नमस्कार करून आसनावर बसावे प्रथम पंचांगाचा उल्लेख केला जातो तिथी वार नक्षत्र करण योग याला पंचांग असे म्हणतात सोबतच संकल्प केला जातो संकल्प म्हणजे ज्या कारणासाठी उदक शांती करतोय त्याला संकल्प असे म्हणतात प्रथम गणपतीपूजन केले जाते नंतर मुख्य देवतेच्या स्थापनेसाठी गुरुजींना वर्णी दिली जाते थोडक्यात मुख्य देवतेच्या स्थापनेसाठी गुरुजींना निमंत्रण देणे याला वर्णी असे म्हणतात नंतर गुरुजी यजमानांच्या नाव गोत्राचा उल्लेख करून न्यास करून कलश शंख घंटा दीप पुजन करतात नंतर संपूर्ण घरात पिवळी मोहरी धूप पंचगव्य शुद्धोदक प्रोक्षण करून  घराची शुद्धी करतात नंतर गव्हाचे स्थंडिल करून चौकोन करून  त्यामध्ये कलश स्थापन केला जातो व त्यावर ब्रह्मदेवाची स्थापना पूजा केली जाते कलश दर्भाने अच्छादला (झाकला) जातो  नंतर चार दिशेला चार गुरुजी बसून कलशाला दर्भ लावून मंत्र पठण करतात ( कलश अभिमंत्रित करतात) दर्भ हे मंत्र वाहक आहेत त्यामुळे  दर्भाला फार महत्त्व आहे शेवटला कलशा मधल्या अभिमंत्रित पाण्याने सर्वांवर अभिषेक केला जातो  यजमानांना तीर्थप्रसाद व आशीर्वाद दिला जातो व कर्माची सांगता होते