Satyanarayan Puja सत्यनारायण पूजा

Satyanarayan Puja सत्यनारायण पूजा का करावी आणि कशी करावी By GurujiJunction

सत्यनारायण पूजा – नारद मुनींना ज्यावेळी भूतलावर फिरत असताना लोक द:खी कष्टी आहेत असे दिसले तेव्हा ते वैकुंठामधे गेले तिथे त्यांनी महाविष्णुंना विचारले की भूतलावरती लोक द:खी कष्टी आहेत त्यांचे दु:ख नाहिसे करण्याचा एखादा उपाय सांगावा त्यावर महाविष्णु म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व ईच्छा पूर्ण करुन मनातील फळ देणारा आहे म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे अश्या प्रकारे  सत्यनारायणाची कथा आहे आता आपण पूजा कशी करावी ते बघुया. प्रथम आचमन प्राणायाम करावे नंतर कपाळी कुंकुमतिलक धारण करावे देवांना विडा नारळ ठेवावा देवांना मोठी माणस गुरूजींना नमस्कार करावा व आसनावर बसावे.सुरवातीला गुरूजी पंचागाचा उल्लेख करतात पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र करण योग याला पंचांग असे म्हणतात.नंतर संकल्प केला जातो म्हणजे ज्या कारणा साठी मी सत्यनारायणाची पूजा करतोय त्याला संकल्प असे म्हणतात. नंतर सुरवातीला गुरूजींकडुन गणपताचे पूजन करावे कलषावरती नवग्रह स्थापना पूजा करावी व सत्यनायणाची स्थापना व षोडषोपचारे पूजा करावी विष्णुसहस्रनामावलीने तुळशी वहाव्या षोडषोपचार पूजा म्हणजे आवाहन, आसन, पाद्य,अर्घ्य,आचमन,स्नान,वस्त्र, उपवस्त्र,गंध,फुल,धुप,दीप ,नैवेद्य प्रदक्षिणा, नमस्कार ,मंत्रपुष्पांजली याला षोडषोपचार पूजा असे म्हणतात. नंतर  सत्यनारायणाच्या पोथीची पूजा करावी. गुरूजींना गंध फूल द्यावे नंतर गुरूजींकडुन सत्यनारायणाची कथा ऐकावी   विष्णुसहस्रनामावलीने तुळशी वहाव्या व सत्यनायणाला शिरा प्रसाद अर्पण करावा गुरूजींकडुन सत्यनायणाची कथा ऐकावी व सत्यनायणाची आरती करावी आपले बंधु बांधव परिवार यांच्यासह पूजा कथा ऐकुन तिर्थ प्रसाद घ्यावा .