Navagraha Shanti Puja – नवग्रह शांती म्हणजे काय

नवग्रह शांती म्हणजे काय, का करावी, Navagraha Shanti Puja

Navagraha Shanti Puja

नवग्रहशांती म्हणजे काय? आपल्या जन्म पत्रिकेमध्ये  जे ग्रह असतात ते आपल्याला अनुकूल असावेत म्हणून केली जाणारी शांत म्हणजे नवग्रह शांती. नवग्रह शांती का करावी? शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये विवाह कार्यामध्ये व एकंदरीतच आपल्या आयुष्यामध्ये नवग्रहांची आपल्यावर कृपा असावी येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून नवग्रह शांती अवश्य करावी सुरुवातीला आचमन प्राणायाम करून देवाला विडा नारळ ठेवला जातो नंतर देवाला मोठी माणसं गुरुजी यांना  नमस्कार करून आसनावर बसावे प्रथम गणपती कुलदेवतेचे स्मरण  करावे गुरुजी पंचांगाचा उल्लेख करतात व यजमानांना संकल्प सांगितला जातो प्रथम यजमानांकडून गणपतीचे पूजन पुण्याहवाचन मातृकापूजन नांदीश्राद्ध इत्यादी पूजन केले जाते नंतर गुरुजी यजमानांचे गोत्र व नावाचा उल्लेख करून आचार्य कर्म करतात संपूर्ण घरामधे पिवळी मोहरी पंचगव्य शुद्धोदक इत्यादी प्रोक्षण  करून घराची शुद्धी केली जाते नंतर गुरुजी नवग्रहांची स्थापना व षोडशोपचारे पूजा करतात षोडशोपचार  म्हणजे  (१)आवाहन  (२)आसन  (३)पाद्य  (४)अर्घ्य.  (५) आचमन.  (६)स्नान.  (७)वस्त्र.  (८)यज्ञोपवीत.  (९) गंध.  (१०)फूल .  (११)धूप .  (12)दीप.  (१३) नैवेद्य.  (१४)  प्रदक्षिणा.  (१५) नमस्कार. (१६) आणि मंत्र पुष्पांजली नवग्रह मंडल देवता ह्या एकंदरीत 42 देवता असतात म्हणजे प्रत्येक ग्रहांच्या उजव्या बाजूला = १ व डाव्या बाजूला = १ देवता असते  उजव्या बाजूच्या  देवतेला  अधिदेवता तर डाव्या बाजूच्या देवतेला प्रत्यधिदेवता असे म्हणतात, या देवता = २७ होतात गणपत्यादी सात देवता व अष्टदिक्पाल देवता = ८ अशा सगळ्या मिळून = १५  आणि पहिल्या = २७ अशा सगळ्या मिळून = ४२ देवता होतात.

नवग्रहांची आपल्यावर अखंड कृपा दृष्टी असावी नवग्रह आपल्यावर प्रसन्न असावेत म्हणून त्या त्या ग्रहांचे रंग रत्न धान्य फुल त्यांना अर्पण करावे हे  पुढील प्रकारे असतात =

(१) सूर्य -रंग = भगवा धातु = सुवर्ण – रत्न = माणिक -धान्य = गह-ू फुल = रक्तकमळ

(२) सोम- रंग = पांढरा – धातू = सुवर्ण रत्न = मोती – धान्य = तांदूळ – फुल = पांढरे फूल

(3)मंगळ – रंग = लाल- रत्न = प्रवाळ – धान्य  = मसूर – फुल = लाल कमळ  

(४) बुध  रत्न= पाचू- धान्य = मुग

(५) गुरु- रंग= पिवळा – रत्न = पुष्कराज – धान्य = हरभरा – डाळ- फुल =पिवळे फूल

(६) शुक्र -रंग =पांढरा- रत्न =हिरा- धान्य= तांदूळ- फुल =पांढरे फूल

(७)शनि-रंग =निळा- रत्न= नीलम- धान्य= उडीद-फुल= निळे फूल

(८)राह-ू रंग= काळा रत्न- गोमेद- धन्य- तीळ- फुल= निळ्या रंगाचे

(९)केतू = रंग=  राखाडी- धान्य= तीळ- रत्न= लसण्या- फुल =राखाडी रंगाचे ई.     नवग्रहांना त्या त्या प्रकारची वस्तू अर्पण केल्यास नवग्रहांची कृपादृष्टी आपल्यावर  राहायला मदत होते त्यानंतर नवग्रहांसाठी साठी होम हवन केले जातेे होम-हवन केल्याने घरामधे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी टिकून राहण्यास मदत होते नंतर नवग्रह व क्षेत्रपाल देवतेसाठी बलिदान पूजन केले जाते ( बलिदान म्हणजे  आपल्या घराच्या बाहेर परिसरामधे क्षुद्र देवता असतात त्यांच्यासाठी केले जाणारे पूजन म्हणजे बलिदान व स्थानदेवतेला क्षेत्रपाल असे म्हणतात) नंतर पूर्णाहुती होते पूर्णाहुती म्हणजे नवग्रहां साठी जे काही आपण होम हवन केले  त्यामधे कमी अधिक आहुती आपल्याकडून दिली गेली असेल तर प्रायश्चित्त म्हणून जी आहुती दिली जाते त्याला पूर्णाहुती असे म्हणतात  नंतर यजमानांकडून नवग्रहांचे पंचोपचार पूजन केले जात (पंचोपचार म्हणजे गंध फुलं  धूप दीप नैवेद्य याला पंचोपचार असे म्हणतात) नंतर यजमानांवर अभिमंत्रित पाण्याने अभिषेक केला जातो नंतर यजमानांकडून गोप्रदानाचा संकल्प केला जातो कुठलेही धार्मिक कार्य शांती आदी संपन्न झाल्यावर गुरुजींना यजमानांनी वासरा सहित गोप्रदान करावे पूर्वीच्या काळी ते शक्य होते आता काळानुसार ते शक्य  होईलच असं नाही म्हणून यथा शक्ती द्रव्य द्वारा गोप्रदान करावे नंतर गुरुजी यजमानानां तीर्थ प्रसाद देतात व कर्म ईश्वरार्पण होते. धन्यवाद