Janan Shanti – जनन शांती म्हणजे काय

जनन शांती म्हणजे काय तर जातकाच्या जन्माच्या वेळी खराब काळ असेल तर त्याचा  परिहार व्हावा बालकाचे  भविष्य  चांगले  घडावे यासाठी केली गेलेली शांत  म्हणजे जनन शांत. शक्यतो बालकाच्या जन्मापासून  बाराव्या दिवशी जनन शांती करावी त्यावेळी मुहूर्त वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही त्यावेळी नाही जमल्यास योग्य दिवशी मुहूर्त पाहून अग्नी पृथ्वी वर असताना  योग्य गुरुजींकडून करून घ्यावी जन्माच्या वेळी पुढीलप्रमाणे योग असल्यास जनन शांती करावी तिथी – कृष्ण चतुर्दशी, अमावस्या
 
नक्षत्रे – अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.
 
योग – वैधृती, व्यतीपात, भद्रा ( विष्टी )
इतर – ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ – बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावीवार-नक्षत्र-तिथीयोग शांती : वार, नक्षत्र व तिथीच्या विशिष्ट संयोगाने यमघंटयोग , मृत्युयोग , कालदंडयोग, दग्धयोग  होतो.
 • रविवारी  मघा नक्षत्र असेल तर
 • सोमवारी विशाखा नक्षत्र असेल तर
 • मंगळवारी आर्द्रा नक्षत्र असेल तर
 • बुधवारी मूळ नक्षत्र असेल तर
 • गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असेल तर
 • शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असेल तर
 • शनिवारी हस्त नक्षत्र असेल तर
 • रविवारी अनुराधा नक्षत्र असेल तर
 • सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असेल तर
 • मंगळवारी शततारका नक्षत्र असेल तर
 • बुधवारी अश्विनी नक्षत्र असेल तर
 • गुरुवारी मृग नक्षत्र असेल तर
 • शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असेल तर
 • शनिवारी हस्त नक्षत्र असेल तर
 • रविवारी भरणी नक्षत्र असेल तर
 • सोमवारी आर्द्रा नक्षत्र असेल तर
 • मंगळवारी मघा नक्षत्र असेल तर
 • बुधवारी चित्रा नक्षत्र असेल तर
 • गुरुवारी ज्येष्ठा नक्षत्र असेल तर
 • शुक्रवारी अभिजीत नक्षत्र (पहिला भाग )असेल तर
 • शनिवारी पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असेल तर
 • रविवारी द्वादशी तिथी असेल तर
 • सोमवारी एकादशी तिथी असेल तर
 • मंगळवारी पंचमी तिथी असेल तर
 • बुधवारी तृतीया तिथी असेल तर 
 • गुरुवारी षष्ठी तिथी असेल तर 
 • शुक्रवारी अष्टमी तिथी असेल तर
 • शनिवारी नवमी तिथी असेल तर

ग्रहण जनन शांती : सूर्य ग्रहणात किंवा चंद्र ग्रहणात जन्म झाला असेल तर.

अन्य कारणे : यमल (जुळी संतती), एकनक्षत्र (भावंडांचे एकच नक्षत्र किंवा आई/वडील व मूल यांचे एकच नक्षत्र असल्यास), त्रिकप्रसव (तीन पुत्रांनंतर कन्याजन्म किंवा तीन कन्यांनंतर पुत्रजन्म), सदंत (दात असलेल्या बालकाचा जन्म), अधोमुखजन्म (पायाळू), षड्ग्रहादि (पत्रिकेतील एकाच स्थानात ६ ग्रहांची युती असेल तर), (पौष महिन्यात स्त्रीची पहिली प्रसूती झाली तर), विपरीतजनन (चमत्कारिक अवयव, अवयवन्यूनता व अवयवाधिक्य), इ. या अशा वेगवेगळ्या शांती मधेे देवता त्यांच हवन वेगवेगळं असतं तसेच जनन शांती सोबत गोप्रसव शांत केली जाते त्यामधे गाईची पूजा गाईला तीन प्रदक्षिणा गाईने बालकाला हुंगणे अवघ्राण म्हणजे मातापित्यांनी बालकाची टाळू हुंगणे इत्यादी अंतर्भूत असते असा हा विधी असतो  शिवाय जातकाचा जन्म झाल्यावर योग्य ज्योतिषांकडून त्याची पत्रिका बनवून घ्यावी योग्य वेळी ह्या सगळ्या शांती केल्या म्हणजे बालकाचे भविष्य उज्वल होते धन्यवाद क्रमशः