Griha Pravesh Puja | ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय?

Griha Pravesh Puja - ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय? यांचे महत्त्व आणि का करावी.

ग्रुहप्रवेष पूजा म्हणजे काय? घरामधे पूजा करून प्रवेष करणे म्हणजे ग्रुहप्रवेष.गृहप्रवेष पूजा कधी व का करावी ?आपली वास्तु जर बांधुन तयार असेल आणी आपल्याला जर रहायला जायचे असेल  घरामध्ये किरकोळ काही काम चालू असेल किंवा वास्तुशांतीचा मुहुर्त ऊशीरा असेल तर ग्रुहप्रवेष करून रहायला जायला हरकत नाही पण वास्तुशांती च्या मुहुर्तावर वास्तुशांत करावीच. गुरुजींकडून  गृहप्रवेषासाठी शुभ मुहूर्त काढून घ्यावा गृहप्रवेष ज्या दिवशी करायचा आहे त्या दिवशी घरामधे मांगलिक वाद्य लावावे दाराबाहेर रांगोळी काढावी दाराला तोरण बांधावे दारावर गणपतीचे चित्र लावावे दारावर कुंकवाने स्वस्तिक शुभ लाभ काढावा आता गृहप्रवेषाच्या विधी कडे वळूया ग्रुहप्रवेष विधी  =सुरवातीला यजमानांनी आचमन प्राणायाम करून कपाळी कुंकूमतिलक धारण करणे नंतर देवांना विडा नारळ ठेउन देवाला नमस्कार करावा मोठी माणस गुरूजी इत्यादींना नमस्कार करून आसनावर  बसावे नंतर यजमानांनी गणपती कुलदेवता यांचे स्मरण करावे.गुरूजी पंचागाचा उल्लेख करतात पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र करण योग याला पंचांग असे म्हणतात नंतर गुरुजी यजमानांना संकल्प सांगतात  संकल्प म्हणजे  मी ज्या कारणासाठी गृहप्रवेष पूजा करतोय  त्याला संकल्प असे म्हणतात  संकल्प सोडल्यानंतर प्रथम यजमानांकडुन गणपती पूजन केले जाते  कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पडावे  त्याच्यामधे कुठलेही विघ्न येऊ नये  म्हणून गणपती पूजन करावे नंतर पुण्याहवाचन कलशपूजन केले जाते.पुण्याहवाचन म्हणजे पुण्य शुभकारक मंत्राचे केलेले वाचन. थोडक्यात आजचा दिवस  पुण्यकारक मंगलकारक आनंददायक जावो  असा जो गुरुजी आशीर्वाद देतात त्याला  पुण्याहवाचन असे म्हणतात त्यामधे दोन कलशांची पूजा होते  गुरुजी यजमानांकडून  मंत्रांचे उच्चारण करत ७२वेळा हातावरून  2 वेगवेगळ्या ताम्हणात हातावरून पाणी सोडायला  सांगतात त्याचा अर्थ असा की  ज्या सकारात्मक चांगल्या गोष्टी आहेत  त्यासाठी पहिल्या ताम्हणात  पाणी सोडावे व नको असणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत  त्यासाठी दुसऱ्या ताम्हनात पाणी सोडावे ते झाल्यावर गुरुजी आशीर्वाद पर मंत्रांचे उच्चारण करतात सुहासिनी देवाला तुपाच्या निरांजनाने  औक्षण (ओवाळणे) करते व यजमान पती-पत्नीला तेलाच्या दिव्याने औक्षण करते आपल्याकडे औक्षणाला फार महत्त्व आहे मंगल प्रसंगी  नवीन गोष्टीची सुरुवात करताना तसेच अपेक्षित यश मिळाल्यास धार्मिक कार्यामध्ये औक्षण आवर्जून केले जाते.औक्षण केल्याने आयुष्य वाढते असा त्यामागचा अर्थ आहे  इत्यादी पूर्ण झाल्यावर पूजा केलेल्या अभिमंत्रित कलशातील पाण्याने यजमान पती-पत्नीवर व कुटुंबातील सर्व लोकांवर अभिषेक केला जातो इथपर्यंत केलेल्या पूजेला पुण्याहवाचन  (कलश पूजन) असे म्हणतात नंतर यजमानांकडुन घराच्या उंब्र्यावर पूजा केली जाते. यजमान पत्नीने लक्ष्मी स्वरूप केरसुणीची पूजा करावी नंतर सुवासिनी  यजमानांच्या पायावर दुध पाणी व यजमानांना औक्षण करते.नंतर यजमान पत्नीने कलष यजमानांनी गणपतीचा फोटो घेउन संपूर्ण घरात जावे म्हणजे देवांना घर दाखवावे.नंतर यजमान पत्नीकडुन अग्नीची पूजा कली जाते  त्यावेळी दूध ऊतू घालवावे नंतर यजमानांना आशीर्वाद दिला जातो. अशाप्रकारे गृहप्रवेष पूजा संपन्न होते धन्यवाद