Pandit for Vastu Shanti Puja and Marriage in Pune & Mumbai

Contact Pandit ji now for All Puja Services

आपले स्वागत आहे गुरुजी जंक्शन या संकेत स्थळावर गुरुजी जंक्शन या संकेतस्थळावर आम्ही विविध प्रकारच्या म्हणजे वास्तुशांती गृहशांती आणि नक्षत्र शांती पूजा, नवग्रह शांती पूजा तसेच विविध प्रकारची शांती किंवा पूजन मानवी जीवनात आवश्यक आहेत आणि ते पारंपरिक पद्धतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच अशा प्रकारची माहिती या संकेतस्थळावर ती आम्ही उपलब्ध करीत आहोत
Welcome to Guruji Junction website, in this Gurujijunction website we provide different types of Vastu Shanthi , Grahashanti Puja and various kinds of peace or worship in human life and we are trying to bring it in a traditional way, and we are making such information available on this website.

Guruji Junction provides one of the best Pandits required for all kind of puja in Pune and Mumbai.
Book Guruji Junction, guruji for puja in Pune or Mumbai at the best affordable price and enjoy hassle-free puja at your home. We offer all types of Pujas like Griha Pravesh And Vastu Shanti Puja, New Office Opening Puja, Satyanarayan Puja, Ganesh Puja, Munja Ceremony, Udaka Shanti Pooja and Havans like Chandi Havan, Navagraha Havan, Sudarshan Havan and Festival Pujas like Diwali Lakshmi Puja, Kalash Sthapana Puja, Tulsi Vivah Puja.

We are experienced and specialized Pandits, Purohits, Maharaj, Guruji, Bhatji for all your rituals. We offer all puja services in Pune and Mumbai. Call now to book a Pandit, Bhatji, Brahmin, Purohit, Guruji, Priest for all types of pujas and vidhis. For more details call us.

आज आपण जाणून घेणार आहोत धार्मिक कार्य आणि विज्ञान यांचा एकमेकांशी असलेला संबंध आपण ज्या दैनंदिन जीवनामधे पूजा शांती अभिषेक जप वगैरे करतो त्याचा आणि विज्ञानाचा संबंध असतो असं माझं वैयक्तिक मत आहे. पूजा शांती मधे सुरुवातीला चे पंचगव्य प्यायला दिल जात पंच म्हणजे पाच गव्य म्हणजे गाय गाई पासून निर्माण झालेले पाच पदार्थ (गोमुत्र शेण दूध दही तूप) म्हणजे पंचगव्य आयुर्वेदानुसार पंचगव्य प्यायल्याने शरीराला लाभ होतो नंतर कार्य सुरू करताना देवाला आई-वडिलांना गुरुजींना आपण नमस्कार करतो त्याच्या मागे काय कारण आहे?घरातून बाहेर पडताना दररोज मोठ्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असं सांगितलं जातं त्याने शरीराला व्यायामही होतो पण आपल्याकडून ते होतच असं नाही म्हणून ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये  तशी सोय करून ठेवलेली आहे  त्यानंतर पूजा सुरू  करायच्या आधी कपाळी कुंकुमतिलक धारण करायला सांगितलेले आहे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे म्हणून दररोज  पुरुषांनी कुंकू स्त्रियांनी हळदी कुंकू  लावायला सांगितलेल आहे त्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. तसेच दारामध्ये रांगोळी स्वस्तिक काढायला सांगितल गेल आहे  ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणसाला सकारात्मक राहण्यास तसेच घरामध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण टिकून राहण्यास मदत होते आता आपण पूजा शांती सुरू झाल्यावर काय काय गोष्टी  क्रमानुसार होतात पाहू.

नं 1 आचमन -पूजा सुरू करताना सुरुवातीला आपण आचमन करतो आचमन म्हणजे तीन वेळा पाणी पिणे चौथ्यांदा हातावरून खाली सोडणे ह्याला आचमन असे म्हणतात. आयुर्वेदानुसार पाणी हे थोडं थोडं ठराविक अंतराने प्यायल्याने शरीराला लाभ होतो.

नंबर -2 प्राणायाम आयुर्वेदानुसार प्राणायामाचे फार महत्त्व आहे. प्राणायाम हा दररोज करावा  पण आपल्याकडून तो होतोच असं नाही म्हणून पूजेमध्ये शास्त्रकारांनी तशी मुद्दामहूून सोय करून ठेवली.

नंबर 3 संकल्प -संकल्प म्हणजे आपण ज्या कारणासाठी पूजा शांती करतोय त्याला संकल्प असे म्हणतात. तसेच जीवनामध्ये एखाद निश्चित ध्येय निश्चित वेळेत गाठण्यासाठी सुद्धा संकल्प गरजेचा असतो सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर गोल सेट करणं महत्त्वाचं असतं नंतर आपली पूजा शांती निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आपण गणपतिपूजन पुण्याहवाचन करतो कुठलही काम निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणपती पूजन हे अवश्य करावे. पुण्याहवाचन म्हणजे पुण्यकारक मंत्रांचे गुरुजींनी केलेले वाचन त्यामध्ये 2   कलशांची म्हणजे वरुणाची पूजा केली जाते वरूण म्हणजे पाणी आपल्या जीवनामध्ये आणि शरीरामध्ये 70 टक्के पाणी आहे पाण्याचा बॅलन्स बिघडला तर अनेक आजार होण्याची शक्यता असते म्हणून पाण्याचा बॅलन्स आवश्यक आहे यासाठी वरूण पूजन केले जाते. त्यानंतर गुरुजी मंत्र पठण करतात मंत्र पठण केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्रः आज-काल जीवन इतके तणावपूर्ण झालेले आहे की लोक ध्यान  धारणेकडे वळत आहेत.मंत्र पठण जप अभिषेक केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते.आपण आंघोळ केल्यावर जे काही स्तोत्र जप करतो त्यावेळी आपल्याला सकारात्मक पॉझिटिव्हिटी चा अनुभव येतो एखादं गाणं गुणगुणत असताना सुद्धा आपल्याला छान वाटतं म्हणजे काय होतं तर आपण त्यावेळी  तणावमुक्त असतो दररोज ओमकार म्हटल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध झालेले आहे. मंत्रामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी स्टेबल राहण्यास मदत होते.

नंबर 4  नवग्रह पूजा -आपल्या कुंडलीमध्ये जी बारा स्थाने आहेत त्यामधील ग्रह अनुकूल असावेत म्हणून ग्रह पूजा केली जाते. चंद्र सूर्य यांचा समुद्राच्या भरती-ओहोटी शी संबंध असतो तसाच इतर ग्रहांचा पण मनुष्याच्या जीवनाशी संबंध असतो म्हणून जवळजवळ प्रत्येक शांतीमध्ये नवग्रह पूजा होतेच

नंबर 5 होम हवन- शास्त्रानुसार अग्नी मुखा वै देवाः असे म्हटलेले आहे म्हणजे देवतांच मुख म्हणजे अग्नी असा त्याचा अर्थ होतो मंत्रोच्चारांसोबत होम हवन केल्याने घरामध्ये सकारात्मकता टिकून राहण्यास मदत होते पाश्चात्त्य देशांमधे लोक अग्निहोत्र होम हवन इत्यादींमुळे होणारे फायदे अनुभवत आहेत म्हणून धार्मिक कार्य ही घरांमध्ये कायम करावीत त्यानिमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होत असतात.असो सांगायचा मुद्दा एवढाच की आपली धार्मिक कार्य आणि विज्ञान यांचा संबंध आहे फक्त आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे…

Subscribe Our Youtube Channel

संपर्क साधा

अधिक माहितीसाठी गुरुजींना आजच संपर्क करू शकता

Whatsapp

संपर्क करण्यासाठी तुम्ही आम्हास व्हाट्सअप चॅटिंग देखील करू शकता

Calling

बुकिंग  करण्यासाठी तुम्ही आम्हास फोन देखील करू शकता

अधिक माहितीसाठी गुरुजींना आजच संपर्क करू शकता
संपर्क करण्यासाठी तुम्ही आम्हास व्हाट्सअप चॅटिंग देखील करू शकता
ई मेल करू शकता किंवा फोन करू शकता धन्यवाद

...

Reach Us

Location :

Narayan Peth, Pune 411027

Email :

info@gurujijunction.com

Phone :

+9191758 69813

सोशल मीडियाद्वारे तुम्ही आम्हास संपर्क करू शकता तसेच आम्ही फेसबुक वर पण उपलब्ध आहोत ट्विटर इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियावरती आम्हास Follow करू शकता